जनसेवा करायला मुळात ती रक्तात असावी लागते…

जनसेवा करायला मुळात ती रक्तात असावी लागते…

नागेश ओरोसकर यांचे दखलपात्र कार्य…

ओरोस:

कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे फार कठीण काम असते. कारण त्या व्यक्तींच्या रक्ताचे नातेवाईकही पुढे येत नाहीत किंवा पैसे देऊ नये कोणी अंत्यसंस्कार करायला बघत नाही.

मात्र ओरोस येथील कट्टर शिवसैनिक नागेश ओरोसकर यांनी सेवाभावी वृत्तीतून हे काम स्वीकारले आहे. जोखीम स्वीकारत ते अव्याहत हे काम करीत आहेत. प्राधिकरणमधील स्मशानभूमीमध्ये एकच शेड असल्याने अंत्यसंस्कार करताना दिवसभरात चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होते.

पाच पेक्षा जास्त असतील तर दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नसतो. अशाही परिस्थितीत काही मृतांच्या नातेवाईकांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी रात्री एक वाजताही अंत्यसंस्कार केलेले आहे.

सद्यस्थितीत एकापेक्षा जास्त स्मशान शेड उभारणे आवश्य आहे. प्रशासनाने ते न उभारल्यास आपली स्वतः पुढाकार घेऊन अतिरिक्त स्मशान शेड उभारण्याची तयारी असल्याचे नागेश ओरोसकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा