You are currently viewing चिंदर ग्रामपंचायतीत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस उत्साहात साजरा

चिंदर ग्रामपंचायतीत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस उत्साहात साजरा

आचरा :

 

चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. चिंदर ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासन, कृषी विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी व टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाकृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, माजी सभापती हिमाली अमरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव मार्गदर्शन करताना म्हणाले कि तृणधान्य वर्ष घोषित करण्याची आपल्यावर वेळ का आली? आपण तृणधान्य वापरा पासून लांब जात होतो. पण आपल्याकडे तृणधान्य ही सोन्याची खान आहे आणि त्याचे महत्व जगालाही आता पटले आहे. तसेच कमी कालावधीत उत्कृष्ट कार्यक्रम केल्या बद्दल चिंदर ग्रामपंचायत व तालुका कृषी विभागाच्या पाठी वर कौतुकाची थाप देण्यात ते विसरले नाही, उपसरपंच दिपक सुर्वे, माजी सभापती हिमाली अमरे, कृषी अधिकारी शिंदे यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनात श्रीमती रेखा मनोहर पिळणकर यांनी प्रथम, अंजली संतोष गोसावी यांनी द्वितीय तर नीलिमा अरविंद घाडी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांचा तालुका कृषी विभागाकडून, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आला. या स्पर्धेत प्रियांका धोंडू वराडकर, स्वाती सुधीर सुर्वे, सुप्रिया सुरेंद्र पडवळ, सोनल सुनिल कदम, जान्हवी जनार्दन घाडी, हिमाली सीताराम अमरे, आकांक्षा संदिप गावडे, चिंन्मयी चंद्रशेखर पाताडे यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण स्नेहल जिकमडे व अमृता भोगले यांनी केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, शशिकांत नाटेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, प्रफुल्ल हडकर, दिगंबर जाधव, विलास हडपी, समिर अपराज, सिद्धेश नाटेकर, रणजित दत्तदास, साधना पाताडे, रोहिणी केळसकर, डी. डी. गावडे आचरा मंडल अधिकारी कृषी, एग्रीकार्डचे संतोष गावडे, पवण सुगडे, अस्विन कुरकुटे, विद्या कुबल, मिलिंद कांबळे, आनंद धुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. सावंत यांनी, सूत्रसंचालन डी. डी गावडे तर आभार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − four =