फक्त कोरोना लसी ने कोरोनावर मात करणं शक्य नाहीय – WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस

फक्त कोरोना लसी ने कोरोनावर मात करणं शक्य नाहीय – WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस

 

कोरोना या संकटासोबत जगाला इतर आजारांप्रमाणेच दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांवर उपचार करणे हाच माणसाच्या हाती असलेला पर्याय आहे. लस आणि औषधांसाठी संशोधन होत आहे. ते यापुढेही होत राहील. पण लस सापडली म्हणजे कोरोना संकट संपेल, असा विचार करणे योग्य होणार नाही. वास्तवाचे भान ठेवून दीर्घकाळ काम करत राहावे लागेल. लस मिळाली तरी कोरोना संकट संपणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस म्हणाले.

टेड्रोस म्हणाले, करोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही. विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे.

टेड्रोस म्हणाले, सुरुवातीला करोनावरील लस पुरवठा हा मर्यादित असेल. त्यामुळे ही लस आरोग्य कर्मचारी, वृद्ध लोक आणि इतर जोखीम असणार्‍या लोकांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मृत्यूची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणेला करोनाशी लढण्यास मदत होईल. गेल्या काही महिन्यांत जगभरात करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून या विषाणूने ५४ दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे. तर सुमारे १.३ दशलक्ष लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या जगाचं लक्ष करोनाच्या लशीकडे लागलेलं असताना या विधानामुळं संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा