You are currently viewing नाळ

नाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लघुकथा*

*नाळ*

त्यांनं पाय स्वच्छ धुऊन नवीन आणलेल्या चामड्याच्या चपलात सरकवले ,पानाचा तोबरा भरला आणि शहराकडे घेऊन जाणाऱ्या लाल परी ची वाट बघत, गर्दीने आणि घाणीने खचाखच भरलेल्या, चार-पाच एसटींनाच दाटीवाटींनं उभं राहण्या एवढीच जागा असलेल्या, रंग उडालेल्या एस टी स्टॅन्डवर पाचच मिनिटांत पोचला. गंजक्या पत्राच्या शेडमध्ये वैतागलेला चष्मेवाला चौकशी करणाऱ्यांच्या प्रश्नांकडे सराईतपणे दुर्लक्ष करत फोनवर कुणावर तरी उखडलेला. सगळीकडे माशांनी घोंगावून भंडावून सोडलेल्या, मोकाट जनावरांचा मुक्त वावर असलेल्या फलाटाच्या अगदी काठावर तोही अंग चोरून कसनुशा तोंडानं (पण पानाची पिचकारी मारत) उभा राहिला. अजून पुण्याला जायचं का मुंबैला हे त्याच्या मनानं पक्कं केलं नव्हतं पण पहिले येईल त्या एस टीनं लवकरात लवकर हे गाव सोडायचं हा इरादा पक्का होता. आता त्या चामड्याच्या नवीन चपला फारच करवादत होत्या. घरापासून इथवर येईस्तोवरच त्या चपलांनी पायाला चाऊन चाऊन लालसर चट्टे पाडले होते.मऊ झालेल्या पायाच्या त्वचेला चांगलच हुळहुळायला लागलं.तरी दोन दिवसांपासून म्हातारी काकी मागं भुणभुणत होती की चपलीवर मायेचा बोळा (गोडं तेलाचा) फिरव फिरव म्हणून पण आपणच घरच्यांशी उभारलेल्या भांडणात इतकं काताऊन गेलो की याच म्हातारीनं आपल्या जन्मावेळी पोटच्या पोराच्या तोंडचं दूध माझ्या तोंडात घातलं होतं; हे विसरलो. तेव्हा आई जगती का मरती झाली होती तर तिला मरणाच्या दारातून ओढून काढलं ते याच काकीनं, याकडं पण दूर्लक्ष केलं.

विचारांच्या तंद्रीत असतानाच तो दचकून मागं सरकला…तरी ड्रायव्हरनं करकचून ब्रेक मारत एक सणसणीत शिवी हासडलीच. चारही बाजूंनी धूळ उडवीत चिखलानं आणि धुळीनं पूर्ण माखल्यामुळे लाल पिवळा रंग एक सारखाच दिसत असलेली एसटी स्टँड मध्ये येऊन मागेपुढे करत फलाटाला लागली. लागली की हीsss झुंबड उडाली. आत मध्ये घुसून सीट पकडण्यासाठी उतरणाऱ्याला लोक उतरू देईनात. कोणी खिडकीतनं आपली छोटी बॅग किंवा हात रुमाल तर कोणी पाण्याची बाटली असं काय काय तरी टाकून जागा पकडण्याच्या बेतात होता. त्यातूनच गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्कीला मागं टाकत चलाखीनं तोही वर चढला आणि त्यानं खिडकीजवळच्या एका रिकाम्या सीटवर आपलं अंग झोकून दिलं.चावणाऱ्या चपला पायातनं बाजूला केल्या अन् स्वतःशीच पुटपुटत एक इरसाल शिवी हासडलीच. पाचच मिनिटांत एसटीचं पोट तुडुंब भरलं आणि कंडक्टरनं पुढं कुणाला वर चढू दिलं नाही. ड्रायवरसाहेब आले तसं त्यांनी खार्र् र् र् खुर् र् र् करत स्टार्टर मारला,इकडं कंडक्टरसाहेबांनी डबल बेल मारली तशी रिव्हर्स घेत घेत पुन्हा धुरळा उडवत गाडी स्टॅंडच्या बाहेर आली. मुख्य डांबरी सडकेला लागून तिनं आपल्याच मस्तीत आपली आपली गती घेतली. तिकिटासाठी आस्ते आस्ते करत कंडक्टर त्याच्याजवळ आला.त्यानं मुंबईकडं सुसाट निघालेल्या एस टीचं तिकीट काढलं आणि एक डावसुद्धा मागं वळून गावाकडं पाहिलं नाही.आता पायाला माती लागणार नव्हती. ढेकळं तुडवायला लागणार नव्हती.पायात काटे रुतणार नव्हते. चिखलात राहून राहून पायाला फोडं येणार नव्हती. त्यानं उगाचंच आपल्या पायाकडं पाहिलं आणि चावणार्या चप्पलात तसच त्याना सरकवून दिलं. पावलं शहराकडं निघाली होती. मातीशी असणारी नाळ आता तुटत चालली होती.

©®अंजली दीक्षित

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 2 =