You are currently viewing चहा आणि ब्रून मस्का

चहा आणि ब्रून मस्का

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*चहा आणि ब्रून मस्का*

*आजही जीभेवर रेंगाळणारी चव*

 

चहा हे भारतीयांचे राष्ट्रीय पेय… सकाळची सुरुवात असो, दुपारचा असो की पाहुण्यांचं स्वागत असो अथवा गप्पांचा फड असो…

चहाशिवाय ते शक्यच होत नाही. या चहाचे विविध प्रकार आहेत. त्यातील इराणी चहा हा एक आहे.

इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण…

मुंबईतून दुर्मीळ होत चाललेल्या इराणी हॉटेलात हा खास इराणी चहा मिळतो.. पानी कम चाय हा वाक्प्रचार आपण सर्रास वापरतो. गंमत म्हणजे इराणी हॉटेलची हा पानी कम चाय खासियत आहे.. पाणी अगदी कमी असलेला कडक चहा…!

इराणी चहासोबत बन-मस्का, मावा केक हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे..

चहा आणि ब्रून मस्का

जगण्याचा लागे चस्का

इराणी हॉटेल म्हटलं की बन मस्का आणि चहा हे समीकरण अतुट आहे..

अगम्य वाटणारा बनमस्का हा पदार्थ आज घराघरात बनवत असला तरीही इराणी कॅफेची चव त्याला येत नाही हेच खरं..!

लुसलुशीत बन पावामधून डोकवणारा सोनेरी लोण्याचा थर उकळत्या सोनेरी तपकिरी चहाचा उत्तेजक गंध, डोळ्याला सुखद आणि जिभेला परमानंद देणारा असे…

हा बन पाव सर्व शिष्टाचार सोडून कपात बुचकळून खाण्यातच त्याची मजा होती. दोन घासानंतर चहावर लोण्याचा पातळसा तवंग येई त्या तुपकट चहाचे घुटके घेत चवीत पूर्णपणे बुडून जाणे हाच शिष्टाचार आणि हीच खायची खरी पद्धत!

पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे..! पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच…यात इराणी चहा आणि बनमस्काची टेस्ट काही औरच असते…!

इराणी चहा, बनमस्का आणि इराणी पदार्थ चाखणाऱ्यांची मांदियाळी असते तेव्हा इराणी चहाचा आस्वाद एकदा तरी घेऊन पाहावाच..!

मुंबई आणि इराणी हॉटेल्स हे एक पक्कं समीकरण आहे…

पु. ल. देशपांडेंच्या गोष्टींमधून भेटलेली दिसलेली ही इराणी हॉटेल्स

अलीकडे पुन्हा एकदा या इराणी कॅफेजची क्रेझ झपाट्यानं पसरत असली तरीही जुनी आणि टिपिकल लूक, मेन्यू असणारी इराणी हॉटेल्स यांना लोक शोधून शोधून भेट देत आहेत आणि असतात…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा