You are currently viewing पी.एम्.पी चषक क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या एम् क्रिकेट अकॅडमीच्या संघाने सलग तिसऱ्यादा विजेतेपद पटकावले

पी.एम्.पी चषक क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या एम् क्रिकेट अकॅडमीच्या संघाने सलग तिसऱ्यादा विजेतेपद पटकावले

सावंतवाडी :

 

सावंतवाडीच्या एम् क्रिकेट अकॅडमीच्या संघाने पुणे येथे क्रिकप्लस आयोजित पी.एम्.पी ट्रॉफी १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करून सांघिक खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले. यामध्ये प्रामुख्याने फलंदाजीत विश्वनाथ(पपू) रेगे, साजिल खतीब, मंथन नाईक, सुजल कोरगावकर, इशांत कुबडे व राहुल नेवगी यांनी तर गोलंदाजीमध्ये उस्मा खान, गौरांग बिडये, अमित गगनराज, आर्यन दुधवाडकर, पार्थ नर, कर्णिक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

साखळी सामन्यात अमित गगनराज व पार्थ नर सामनावीर ठरले. तर अंतिम सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा आर्यन दुधवाडकर सामनावीर ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज विश्वनाथ रेगे तर उत्कृष्ट गोलंदाज अमित गगनराज तर स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलगी उस्मा खान हिला गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पुणे येथील नामवंत क्रीक प्लस क्लब, मास्टर क्रिकेट क्लब, पीएमपी क्रिकेट क्लब यांनी सहभाग घेतला होता.

वरील सर्व संघाला स्पर्धे दरम्यान एम् क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षक नागेश रेगे व अविनाश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचे एम् क्रिकेट अकॅडमी अध्यक्ष उदय नाईक व उपाध्यक्ष अक्रम खान यांनी अभिनंदन केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 4 =