You are currently viewing मायनिंग विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा विजय

मायनिंग विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा विजय

*२५ गावं इको सेन्सिटिव्ह झोन; कळणे मायनिंग लिज रद्द होणार*

 

*वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद*

 

सावंतवाडी:

सावंतवाडी – दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉर तसेच येथील वाघांच्या अस्तित्वाबाबतचे अनेक अहवाल शासनाने दडपून ठेवले.वनविभाग तसेच इतर अधिकऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधी,उच्च पदस्थ अधिकारी यांचा दबाव असल्याने त्यांनी डब्लुआयआय राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण यांचे अहवालही दडपले गेले,याच कारणामुळे आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयासमोर आम्ही हे अहवाल मांडले,त्यामुळे न्यायालयाने 25 गावे इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केली.हा मायनिंग विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा विजय आहे,असे वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सोमवारी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जैवसमृध्द असा सावंतवाडी – दोडामार्ग कॉरिडॉर आणि लगतची 25 गावे उच्च न्यायालयाने इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केली आहेत.मात्र राज्य सरकार याबाबत उदासीन होते.आमचा लढा या कॉरिडॉर मधील मायनिंग विरोधात असून,इको सेन्सिटिव्ह मुळे स्थानिक लोकांना कोणताही त्रास होणार नाही, उलट पर्यटनाच्या नव- नवीन संधी उपलब्ध होतील.राज्य शासनाने येथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत,असेही स्टॅलिन यांनी सांगितले.मायनिंगसाठी स्थानिक लोकप्रतीनिधींकडून इको सेन्सिटिव्ह बाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवला गेला,वाघांचे अस्तित्व दाखवले तर अतिरिक्त जवाबदारी वाढते त्यातून वाघांचे अस्तित्व लपविण्यात आले,असा आरोपही स्टॅलिन दयानंद यांनी केला.

स्टॅलिन यांच्या वनशक्ती संस्थेच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील 25 गावे इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केली आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी स्टॅलिन दयानंद सावंतवाडी येथे आले होते.यावेळी 25 गावातील ग्रामस्थांनी स्टॅलिन यांची भेट घेऊन आभार मानले.यावेळी वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद, असनिये येथील पर्यावरण प्रेमी संदीप सावंत,नंदकुमार पवार,डॉ.जयेंद्र परुळेकर, मराठमोळी संस्थेच्या प्रमुख अस्मिता एम.जे तसेच दत्तप्रसाद पोकळे,संदेश कोलते,अनिल सावंत,सदानंद देसाई,विलास सावंत,रणजित सावंत,महेश ठाकूर,मनोज गवस,चंद्रशेखर गवस,हनुमंत जाधव,अविनाश गावडे,गुरुदास गावडे,संदीप गवस,विलास सावंत,नारायण गावडे,संजय देसाई,मोहन वालावलकर,गीता रणसिंग अनिल परब,यशवंत देसाई,संतोष परब,यशवंत सावंत,कमलाकर सावंत,रुपेश पाटील,सतीश घोटगे,दत्ताराम गवस,शशिकांत गवस,अनिल गवस,सचिन गवस,विष्णू घाडी आदी असनिये, तांबुळी,दाभिल,तळकट,झोलंबे,सासोली, सरमळे, तिरवडे, कळणे, घोटगे,आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + twelve =