You are currently viewing सीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखांमध्ये बदल…

सीईटी प्रवेश परीक्षांच्या तारखांमध्ये बदल…

वृत्तसंस्था

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक २१ सप्टेंबरला जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या तारखा एकमेकांशी मेळ खात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षेला मुकावे लागणार होते. याबाबत विद्यार्थी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत सीईटीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करून सीईटी सेलकडून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षांच्या जाहीर करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार काही अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

११ ऑक्टोबरला होणारी बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची १८ ऑक्टोबरला होणार आहे.

एमपी एड ही परीक्षा ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान होणार होती. ही परीक्षा आता २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

एम एड सीईटी ३ ऑक्टोबरऐवजी ५ नोव्हेंबरला होणार आहे.

११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान होणार बी.पी.एड सीईटी ४ ते ८ नोव्हेंबरदरम्यान होईल.

त्याचप्रमाणे ५ वर्ष एलएलबीची सीईटी ११ ऑक्टोबरलाच होणार आहे.

एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी २ व ३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा विविध सत्रामध्ये होणार आहे.

बी.एड अभ्यासक्रमाची सीईटी २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.

बी.एड-एम.एड इंटिग्रेटेडची परीक्षा २७ ऑक्टोबर,

एम.एड ५ नोव्हेंबर, एम आर्च २७ ऑक्टोबर, एम.एचएमसीटी २७ ऑक्टोबर,

एमसीए २८ ऑक्टोबर,

बी.एचएमसीटी १० ऑक्टोबरला होणार आहे.

परीक्षांसंदर्भातील सविस्तर माहिती व हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारी विषयीदेखील हॉलतिकीटावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =