You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

*भुताखेतांच्या गोष्टी*
(क्रमांक १० वा).
————————————
भूतपिशाच्च्य सर्वानाच दिसत नाही हे जरी खरे असले तरीपण ती भूतपिशाच्च्य योनीच नाही , असे म्हणताही येत नाही . अनेकांना पिशाच्च्य योनीचे भूतबाधेचे अनेक अनुभव आलेले आहेत हेही तितकेच खरे ..सर्वत्रच मानवीय अतृप्त आत्म्याची म्हणजेच भूतपिशाच्च्य योनी आहे असे म्हटले जाते . याची जाणीव पूर्वी घड़लेल्या किंवा होणाऱ्या घटना मधून जाणवत असते. पण आजकाल त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खुपच कमी आहे असे म्हणावयास हरकत नाही . मला आलेले अनुभव हे पूर्वीचे म्हणजे सुमारे ६० / ६५ वर्षापूर्वीचे आहेत . पूर्वी मांत्रिक , जादूटोणा , भूतबाधा निवारण करणारी माणसे होती ..त्यामध्ये कर्णपिशाच्च्य विद्या अवगत असणारीही माणसे होती .. पूर्वी भूतबाधा होत असे लहामुले ..बायका , गर्भवती स्त्रीया यांना त्यावेळी खुप बंधने होती . तिन्हीसांजेला बाहेर जायचे नाही..उघड्यावर , झाडापाशी नैसर्गिक विधी साठी कुठेही जायचे नाही . ठराविक ठिकाणीच जायचे ..भुताखेतां साठी उतारून ठेवलेले उतारे ( खाण्या पिण्याच्या वस्तुंचे पान , हळदकुंकु , गुलाल लिंबू वगैरे लावलेले ) कधी ओलांडायचे नाहीत अशी बंधने होती ..
विचित्र काही घड़ले की भूतबाधा झाली असे तेंव्हा समजत असत . खेडोपाडी ,ग्रामीण वस्तिवर अशा गोष्टी ज्यास्त आढळत . आज खेड़यांचे प्रमाण कमी झाले आहे .खुप बदल झाले आहेत ..तरी देखील अजूनही या भूतबाधा प्रकारास तिथे मानतात ..
कर्णपिशाच्च्य विद्या अभ्यासताना त्या व्यक्तिला अनेक अघोरी गोष्टी कराव्या लागतात , त्या अवघड असतात असे म्हणतात ..अपरात्री स्मशानात जावुन स्नान करणे , जळलेल्या चितेतिल प्रेताची कवटी , हाडे , चिताभस्म इत्यादि गोष्टी या विद्याभ्यासासाठी आवश्यक असतात . त्यासाठी घाण ( अगदी विष्ठा देखील ,/ अशाही गोष्टीन्चेही त्या विद्या प्राप्तीसाठी सेवन करावे लागते.अशा अनेक गोष्टी मी अभ्यास्काकड़ून ऐकल्या आहेत .. या गोष्टि केल्यानंतर त्या व्यक्तीला पिशाच्च्य योनी वश होते व त्या व्यक्तीच्या अंकित रहाते . त्याला कर्णपिशाच्च्य विद्या प्राप्त होते असे म्हणतात ..अशी ही कर्णपिशाच्च्य विद्या अवगत असलेली माणसे मी पाहिलित ..पण हे अघोरी कृत्य आहे.
पूर्वी काही घरात उदासीनता , भकासपणा असे , कुणी अनेक वर्षे अंथरुणावर खिळून असे , घरात शांतता नसे , सतत भांडणेही होत असे . मुले दगावत असत ..कितीही कष्ट केले तरी ,पैसे असले तरी पूरे पड़त नसे . सतत चणचण भासत असे . सतत घरात अशांतता असे . रात्री अपरात्री विचित्र आवाज येणे , कुणी वेडे , कुणी अर्धवट अशा अनेक विविध समस्यांनी व्यापलेला समाज दिसत होता ..अशावेळी त्या समस्यांच्या निराकारणासाठी लोक , वैद्य , डॉक्टर , ज्योतिषी , मांत्रिक , अशा लोकांच्या कड़े जात असत ..
काही मांत्रिकांकड़ेही जात असत .
एक प्रापंचिक सद्गृहस्थ अगदी सर्विस करणारे होते. त्यांना *कर्णपिशाच्च्य* विद्या अवगत होती . समाजाच्या भल्यासाठी ते त्या विद्येचा उपयोग करीत असत .खुप लांबुन ( परगांवहुन ) देखील त्यांचे कड़े गरजु लोक येत असत ..त्यामध्ये आमचे एक नातेवाईकही आले होते ..सदर कर्णपिशाच्च्य विद्या अवगत असलेली व्यक्ती ही आमच्या कुटुंबाशी परिचित होती ..त्यामुळे आमच्या नातेवाईकास त्यांचेकडे मी ( माझ्या वयाच्या १६/१७ व्या वर्षी) घेवून गेलो होतो ..त्या ठिकाणी ते जिथे बसत तिथे समोर पाटावर माणसाची कवटी , हाडे , नारळ , कुंकु,गुलाल , नारळ ,लिंब , उदबत्ती अशा अनेक गोष्टी ठेवल्या होत्या ….आमची ओळख असल्यामुळे त्यांनी मला पाहिले बस म्हणाले ” कोण आहे ? मी म्हटले मामा आहे ..! बस एवढेच …त्यांनी डोळे मिटले होते ..काहीतरी कुणाशीतरी अंगविपक्षेप करून मनातल्या मनात बोलत होते …अन क्षणार्धात उदगारले … ” हं काय मुंबईहुन आला का ?. मामा म्हणाला हो ! ..काय गिरगावात झावबावाडीत रहाता कां ? तिथे खाली मारुती मंदीर आहे कां ? उजव्या बाजूला जीना आहे कां ? वर घरात गेल्यावर समोर मुलीचा फोटो लावलाय कां ? मुलगी मेली कां ? तर या सर्व गोष्टीन्ची उत्तरे हो ! होती ..हे आश्चर्य होते …..त्यानंतर त्यांनी पुन्हा डोळे मिटले व म्हणाले तुमच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आहे कां ? तुम्ही बायकोशी नीट वागत नाही कां ? दुसरा घरोबा आहे कां ? तर हे खरे होते . हे काहीही न सांगता त्यांनी ओळखले होते .. ही सर्व माहिती त्यांना कर्ण पिशाच्च्य विद्येमुळेच कळली होती ..त्यांनी मामांचे दुर्गुण देखील स्पष्ट सांगीतले ..हे सारे थक्क करणारे होते .. त्यांनी मामाला वागणुकीत सुधारणा करा आणी काही उपाय सूचविले , पुढे कालांतराने मामांचे प्रोब्लेम सूटले ..
ही घटना मीच स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे .. अशा अनेक गोष्टी आठवणीत आहेत ..त्यामुळे अशा गोष्टी पाहिल्यामुळे माझी भीती मात्र गेली होती.
बाकी पुढील भागात लिहिन …(संक्षिप्त).
*©विगसा*
🙏🙏🙏🙏

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा