ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गला विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणार
रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल; तंजावर येथे होणाऱ्या परिषदेत पुरस्कार प्रदान, दिनेश गावडे स्वीकारणार सन्मान
सिंधुदुर्ग :
रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय आणि अभूतपूर्व कार्य करणाऱ्या ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचा विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन ब्लड डोनर्स ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत तामिळनाडूतील तंजावर येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
रक्तदान क्षेत्रात संस्थेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत या राष्ट्रीय सन्मानासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तथा नियमित रक्तदाते दिनेश गावडे हे संस्थेचे प्रतिनिधी म्हणून तंजावर येथे रवाना झाले आहेत.
