You are currently viewing तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे घवघवीत यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे घवघवीत यश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे घवघवीत यश

दोन स्पर्धांमध्ये द्वितीय, तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक; माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

फोंडाघाट :

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित ५४ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सरस्वती हायस्कूल, नांदगाव येथे उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला.

या विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले. त्यामध्ये विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गटात कु. चिन्मयी द. मोरजकर व अथर्व स. सुतार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती उच्च माध्यमिक गटात दिव्येश हे. रावराणे याने द्वितीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेच्या माध्यमिक गटात कु. मनश्री र. तावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक गटात ओम ल. गोसावी व चिन्मय दि. राणे यांनी सहभाग नोंदविला.

यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक एम. डी. लाड व सौ. डी. डी. पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मराठी विभागातील शिक्षक आणि अमर वायंगणकर यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म. ज. सावंत, सेक्रेटरी चं. शा. लिंग्रस, खजिनदार वि. रा. तायशेटे, शाळा समितीचे चेअरमन द. दि. पवार, संचालक मंडळ, मुख्याध्यापक प्र. कृ. पारकर, पर्यवेक्षक वि. पां. राठोड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शाळेचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी शाळेला भेट देऊन यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि मेहनतीचे त्यांनी विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा