You are currently viewing ज्येष्ठ साहित्यरत्न पुरस्कार मा.मंदा नाईक, बबन पोतदार आणि बाबू डिसोजा यांना प्रदान 

ज्येष्ठ साहित्यरत्न पुरस्कार मा.मंदा नाईक, बबन पोतदार आणि बाबू डिसोजा यांना प्रदान 

गंज पेठ पुणे – दिनांक -२७ नोव्हेंबर रोजी टिंबर मार्केट जवळ शिवसेना युवासेना शहरप्रमुख आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले वाडा भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष मा.निलेशभाऊ गिरमे यांनी संयोजन केलेल्या महात्मा जोतीराव फुले यांच्या १३६ व्या स्मृतीदिनानिमित्त पूर्वसंध्येला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे वारसदार असलेल्या तीन साहित्यिकांचा साहित्यरत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मा.मंदा नाईक,बबन पोतदार आणि बाबू डिसोजा यांना या भव्य कार्यक्रमात महात्मा फुले वाडा या ऐतिहासिक ठिकाणी राज्याच्या विधानपरिषद आमदार आणि माजी उपसभापती मा.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते फुले पगडी,उपरणे, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, रोख पुरस्कार आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

व्यासपीठावर माजी आमदार आणि महानगर प्रमुख शिवसेना मा.रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख शिवसेना मा.प्रमोद नाना भानगिरे महाराष्ट्र राज्य सचिव युवासेना मा.किरण साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

शहरातील सन्मान्य नागरिक, पत्रकार, संपादक, तीन शाळांच्या विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मिलींद पानसरे यांनी उत्तमरीत्या केले.

सालाबादप्रमाणे दिपांजली आणि रांगोळी महात्मा फुले वाड्यात सुरेख रेखाटली.महात्मा फुले यांचे चित्र रंगवून बालचमूने त्यांना आगळे अभिवादन केले.उपस्थितांनी मनापासून दाद दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा