You are currently viewing पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ग्रामीण भागातील आप आपल्या मालकीचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच दक्षता घ्यावी

पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ग्रामीण भागातील आप आपल्या मालकीचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच दक्षता घ्यावी

– प्रफुल्ल सुद्रिक युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गटार सफाई, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्ती, रस्त्यांच्या कडेस असलेल्या व रहदारीस अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या,यांची डागडुजी व साफसफाई करण्याची गरज आहे, सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना त्यांचा अडथळा निर्माण होतो आहे,हा अडथळा दूर करण्यासाठी पावसाळा सिझन सूरू व्हायच्या अगोदर संबंधित अधिका-यांनी यावर सकारात्मक निर्णय करणे आवश्यक आहे,म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही कामे युद्ध पातळीवर हाती घ्यावीत.आणि प्रवाशांचा व वाहनधारकांचा प्रवास सुखकारक व्हावा,असे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सुचित केले आहे,
.

प्रतिक्रिया व्यक्त करा