You are currently viewing महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल

रत्नागिरी

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या रॅली ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गट, रासप, मनसे सह पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकाररि मोठया संख्येने दाखल झाले आहेत वास्तविक रत्नागिरीत मोठ्या प्रमाणत ऊन आहे तरीही आपल्या लाडक्या नेत्याला साथ देण्यासाठी रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्यातून कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल आहेत

मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची भव्य रॅली जयस्तंभ च्या दिशेने निघाली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, आ. शेखर निकम, लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, सहप्रमुख बाळ माने, शिवसेना नेते किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, आरपीआय, रासप, रयत क्रांती या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वत्र भाजपच माहोल तयार झालं होता. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पाणी आणि सरबताची भाजपा तर्फे व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील मुख्य मार्गाची एक बाजू पूर्ण बंद होती. जयस्तंभ येथे विविध जोशपूर्ण गाणी लावून माहोल करण्यात आला

रॅली जयस्तंभ येथे आल्यानंतर भाजपा नेते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितीनं मार्गदर्शन केले तर उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेला संदेश सर्वांनी ऐकला एकुणच संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा