You are currently viewing हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात हजारो दिव्यांची आरास

हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात हजारो दिव्यांची आरास

देवगड :

 

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विधिवत पूजा, अभिषेक, महाआरती आदी कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त गाभाऱ्यासह मंदिर परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात आली होती. पारंपरिक दिव्यांच्या उजेडाने परिसर झळाळून गेला होता. यावेळी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या सह पदाधिकारी व स्वामी भक्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 3 =