You are currently viewing मिम्स व रिल “कोकण सन्मान” स्पर्धा, असंख्य युटूबर्स, इन्फ्लुएन्सर्सना घेतला सहभाग

मिम्स व रिल “कोकण सन्मान” स्पर्धा, असंख्य युटूबर्स, इन्फ्लुएन्सर्सना घेतला सहभाग

मिम्स व रिल “कोकण सन्मान” स्पर्धा, असंख्य युटूबर्स, इन्फ्लुएन्सर्सना घेतला सहभाग

आज सायंकाळी ७ वा. निलम्स कंट्रीसाईड येथे होणार कार्यक्रम

कणकवली

कोकण आणि सिंधुदुर्ग म्हटले की डोळ्यासमोर येतो विस्तीर्ण पसरलेला समुद्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगावरून कोसळणारा धबधबा. माड, सुपारी,काजू आणि आंब्याच्या बागा खवय्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वडे सागोती. अशा या कोकणात त्यातील विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मिम्स व रिलची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची घोषणा केल्यानंतर असंख्य युटूबर्स, एन्फ्ल्यूएंझर्स नी नाव नोंदणी करत सहभाग घेतला आणि अनेक प्रकारचे मिम्स व रिल तयार केले. या सर्वांचे परीक्षण आणि त्यांची गुणवत्ता आज २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. निलम्स कंट्रीसाईड येथे एका विशेष कार्यक्रम पडताळून प्रथम क्रमांक काढला जाणार आहे.

“सन्मान कोकणचा, कोकणातील क्रियेटर्स चा” हे घोषवाक्य घेवून आमदार नितेश राणे यांनी ही स्पर्धा हाती घेतली आहे.याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. युटूब हे प्रभावी माध्यम आहे. कोकणातील अनेक युटूब क्रिएटर कोकणातील विविध विषय प्रेझेंट करत असतात. युटुबर्सची फॉलोअर्सच्या माध्यमातून एक वेगळी ताकद निर्माण केलेली आहे. कोकणातील या युटुबर्स, इन्फ्लुएन्सर्सना एकत्रीत आणून मिम्स, रिल स्पर्धा भरविण्याचा निर्णय एक आगळा वेगळा आणि पहिलाच असल्याने सर्वानाच त्याची उत्सकता लागली आहे. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. निलम्स कंट्रीसाईडच्या लॉनवर हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रीतांसाठी असणार आहे.तर इतरांना पाहण्यासाठी त्याची ऑनलाईन लिंक देण्यात येणार आहे. सर्वजण या लिंकच्या माध्यमातून कार्यक्रम पाहू शकनार आहेत.या स्पर्धेतील रिल्स, मिम्स पाठवावयाची अंतीम तारीख २० फेब्रुवारी होती.

या कार्यक्रमासाठी स्टार क्रिएटर्स अंकिता प्रभू-वालावलकर, (कोकण हार्टेड गर्ल),गौरी पवार. (बिंधास्त मुलगी)सिद्धांत जोशी (श्रीमान लिजेंड),मंगेश काकड (मंगाजी),वृषाली जावळे (वाईनवाली)सोहन शहाणे (rj सोहम),गणेश वनारे (हरामखोर)प्रसाद विधाते (सेंट इन ब्यागी)कुहू परांजपे,श्रुतिक कोळंबेकर (कोण श्रुतिक)प्रशांत नाकती, शंतनू रांगणेकर आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा