You are currently viewing अपघाताच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

अपघाताच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

ॲड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तीवाद

सिंधुदुर्ग

गाव मौजे ओरोस बुद्रुक, मुंबई गोवा महामार्ग नजीकचे सर्विस रोडवर दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 13.30 वाजताचे मानाने फिर्यादी प्रवीण शंकर कांडरकर चालक राज्य परिवहन विभाग मालवण डेपो हे येथे चालक या पदावर कार्यरत आहेत. दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपले ताब्यातील एसटी बस नंबर एम एच 14/ बीटी – 2623 ही मालवण डेपो मधून मालवण ते बेळगाव असा कसाल मार्गे प्रवास करत निघाले व सुमारे 14 .50 वाजताचे दरम्याने ओरोस सुलोचना नगर मुंबई गोवा हायवे येथे सर्विस रोडने येऊन सुलोचनानगर बस स्टॉप वर बस थांबवून बसमधील प्रवासी खाली उतरवून परत सुरू करून पुढे जात असताना पाठीमागून येणारी एसटी बस नंबर एम एच २०/ बी एल -1069 चे मालक याने मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे याची कल्पना असताना व फिर्यादी यांची एसटी बस थांबलेली आहे याकडे दुर्लक्ष करून सर्विस रोड वरून आपले ताब्यातील एसटी बस अविचाराने, हयगईने, बेदरकारपणे धोकादायक रित्या वाहन चालवून फिर्यादी यांचे बसला मागून ठोकर देऊन फिर्यादी यांचे ताब्यातील बसचे मागील उजव्या बाजूकडील काच व आपले एसटी बसचे दर्शनी काच फुटणेस व दोन्ही बसेसचा पत्रा चेपुन नुकसानीच कारणीभूत झाला म्हणून सिंधुदुर्ग गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर 77/2018 भादवि कलम 279 मोटर व्हेईकल ऍक्ट कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल आहे

या कामी सरकारी पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदारांची कसोसुन तपासणी करण्यात आलेली होती. सदर कामी साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती व तफावत यामुळे सरकारी पक्ष आपली केस शाबित करू न शकल्याने आरोपी यांना ओरोस येथील मे. मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब श्री. ए .एम. फडतरे यांनी आरोपी यांची सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदरहू आरोपी यांच्या वतीने विधीज्ञ ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =