कवठी, चेंदवण, वालावल, हुमरमळा गावात जिल्हाप्रमुख, मा.आ.वैभव नाईक यांचा गावभेट दौरा; ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर झाली चर्चा
*नेरूर-कवठी-चेंदवण मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेवरून ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांवर व्यक्त केला रोष*
*जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकाने केले पाहिजे- वैभव नाईक*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी नेरूर जिल्हापरिषद विभागातील कवठी, चेंदवण, वालावल, हुमरमळा या गावात गावभेट दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. विविध विषयांवर चर्चा केली. या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता. माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येक गावात विकास कामासाठी निधी दिला होता. गावात जी विकास कामे झाली आहेत ती वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचे आभार मानत गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.त्याचबरोबर आताच्या सत्ताधाऱ्यांनी विकास कामांच्या अनेक घोषणा केल्या परंतु, त्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत. नेरूर कवठी चेंदवण मुख्य रस्ता अत्यंत खड्डमेय आणि धोकादायक झाला असून रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्याबाबत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. यावेळी वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली. दरम्यान युवासेना बळकट करण्यासाठी चेंदवण युवासेना शाखाप्रमुख पदी नारायण तोरसकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, मी आज आमदार नसलो तरी मी जनसेवेच्या कामात कधीच खंड पडू दिला नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवीत असून यापुढेही कार्यरत राहणार आहे. आताचे लोकप्रतिनिधी केवळ आपल्या फायद्याची कामे मंजूर करून टक्केवारीसाठी ती आपल्या मर्जीतील ठेकेदारांना मिळवून देत आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही. जिल्ह्यातील जनतेला नको असलेले विनाशकारी प्रकल्प सत्ताधारी जिल्हयात आणत असून परप्रांतीय लोकांना जिल्ह्यातील जमिनी मिळवून देत आहेत.सत्ताधाऱ्यांचे अभय असल्यानेच परप्रांतीय लोक येथील स्थानिकांवर अरेरावी करीत आहेत. अदानीचे स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारले जात आहेत.दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सरकारचा धाक नसल्याने गुन्हेगारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यावर आवाज उठविण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकाने केले पाहिजे, मी सदैव तुमच्या सोबत आहे असा ठाम विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी हुमरमळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, कुडाळ शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, माजी सरपंच सुरेश वालावलकर, रमा गाळवणकर, स्नेहलदीप सामंत,शरद वालावलकर, सोनाली मांजरेकर, पंढरी गाळवणकर, नाथा राणे, भिवा गुंजकर, ग्रा.पं.सदस्य संजना गुंजकर, ग्रा.पं. सदस्य हेमांगी कद्रेकर, सुमित परब, वैभव मांजरेकर विजू पेडणेकर अजित केसरकर किशोर वालावलकर पोलीस पाटील सुबोध सावत, योगेश परब, जयसिंग मार्गी, सागर परब, प्रभाकर गुंजकर, शानो परकर धनंजय परकर, पप्पू दळवी, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, रमा मांजरेकर, विजय वालावलकर, नामदेव परब.
कवठी येथे अरुण परुळेकर, दिलीप परुळेकर, एकनाथ बांदेकर, मंगेश बांदेकर, नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, संतोष वि.वाडयेकर, राजन खोबरेकर, संतोष प्र. वाडयेकर, रवी गोडकर, दीपक सांगळे, समीर बांदेकर, सिद्धिविनायक कवठकर, गणपत कवठकर, दिलीप परुळेकर, संजय खोबरेकर, कुणाल बांदेकर, रुपेश खडपकर, महेश भा. वाडयेकर, मधुकर खडपकर, अशोक खडपकर, महेश दि. वाडयेकर, गजानन व. कवठकर, गजानन म.कवठकर.
चेंदवण येथे केशव पिळणकर, अंकुश तोरसकर, शंकर जामसाडेकर, रवी तोरसकर,अनंत पिळणकर, रेवती तोरसकर, मदन तोरसकर, भावेश तोरसकर, ओमकार पिळणकर, सगुण तोरसकर, सत्यविजय तोरसकर, सवैश तोरसकर.
वालावल येथे पूजा राऊळ, शाखाप्रमुख सुनील करवडकर, हेमंत वालावलकर, रवींद्र कावळे,गोविंद पेडणेकर, प्रमोद आडेकर, सागर तेली, राजन वालावलकर,सुनील आडेकर आदि उपस्थित होते.
