You are currently viewing शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट; महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

कणकवली :

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) श्री. प्राजक्त चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत आमदार म्हात्रे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर काम करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने लवकरच महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची शिक्षक कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री. अविनाश परीट, उपाध्यक्षपदी श्री. सतीश तवटे, तर सचिवपदी श्री. सुभाष खरात यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यास दिशा मिळणार आहे.

या भेटीदरम्यान संघटनेचे कानडे सर, वेंगुर्लेकर सर सर्व तालुकाध्यक्ष, विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. चोडणकर सर यांचीही उपस्थिती होती.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी संघटना आगामी काळात सक्रिय भूमिका बजावणार असून, लवकरच जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेचे काम अधिक व्यापक करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा