You are currently viewing कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग , लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला व अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने

कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग , लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला व अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने

कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग , लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला व अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने

*प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजने अंतर्गत जनजागृती कार्यक्रम*

वेंगुर्ले

कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग , लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला व अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमार बांधवांसाठी राष्ट्रीय मत्स्य पालन डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी दि. ७ डिसेंबर 2026 रोजी वेंगुर्ले शहरातील राजवाडा येथील श्री किरण कुबल यांच्या निवास्थानी सकाळी 9.30 वाजता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मच्छिमार बांधवांची नोंदणी करण्यात येणार आहे. मच्छिमार बांधवांनी सोबत येताना आपले आधार कार्ड, आधार कार्डला सलग्न असणारा मोबाईल, बँक पासबुक, तसेच स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र किर्लोस चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. बाळकृष्ण गावडे व लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन वेंगुर्ला अध्यक्षा सौ ज्योती प्रसन्ना देसाई यांनी केले आहे. राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी करणार्‍या मच्छिमार बांधवांना यापुढे स्वतंत्र डिजिटल ओळख मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना (PM- MKSSY) आणि इतर मत्स्य व्यवसाय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मत्स्यपालन विमा प्रोत्साहन व संस्थात्मक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. या कार्यक्रमात मच्छिमारांसाठी असणार्‍या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी करावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र किर्लोस व लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा