You are currently viewing रत्नागिरी बारसुत येण्यासाठी नामचीत गुंडांचे संरक्षण घेण्याची उद्धव ठाकरेंवर वेळ ; आमदार नितेश राणे यांचा आरोप

रत्नागिरी बारसुत येण्यासाठी नामचीत गुंडांचे संरक्षण घेण्याची उद्धव ठाकरेंवर वेळ ; आमदार नितेश राणे यांचा आरोप

हत्यार बंद गुंड आणून बारसूत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे उ.बा.ठा.चे प्लानिंग

कणकवली

उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी बारसू येथील दौऱ्यासाठी टिळकनगर,गोवंडी या भागातल्या गुंडांना फोन करून कोकणात जायचे असल्याचे कळविले आहे. रिफायनरी विरोधासाठी येत असताना उद्धव ठाकरे यांना हत्यार बंद गुंड का आणावे लागत आहेत ? नामचित गुंड जे मोक्का, ३०२ मध्ये आरोपी आहेत.अशा गुंडाच्या संरक्षणात उद्धव ठाकरे रत्नागिरी बारसुत येणार आणि येथील शांतता बिघडवणार. तसा उबाठा सेनेचा प्लान असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. तर संस्काराची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना लहान मुले का लागतात ? लहान मुलांच्या एनजीओ सोबतचे संबंध का टिकून ठेवावे लागतात ? आणि बाल आयुक्तांकडे जेव्हा तक्रार झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांना फोन करून आदित्य यांचे नाव का वगळावे लागले हे मला सांगण्याची वेळ आणू नका. जर आदित्य ठाकरेंवर चांगले संस्कार झाले असते तर आमची भगिनी दिशा सालियान आज जिवंत असली असती. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी संस्काराची भाषा करू नये अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांची आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा धनी समाचार घेतला.
ते म्हणाले, संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे ? स्वतःचा बात कधी सांगायचा नाही आणि दुसऱ्याचे बात काढायचे ही उबाठा सेनेच्या खासदार राऊत यांची वाईट सवय आहे.तुम्ही कोणाचे कुंकू लावता ते तरी सांगा. तुम्ही कोणाचे शिलवरओक चे की मातोश्री चे ते एकदा सांगा.
संजय राऊत हे नेहमीच भांडणे लावण्यात पटाईत आहेत.बाळासाहेबांच्या मुलाखती दरम्यान त्यांनी एक प्रश्न व्येक्तिगत आयुष्यावर विचारला. मा साहेब आणि बाळासाहेब यांच्यात भांडणे लावून विष कलवण्याचा प्रयत्न केला.
असाच प्रयत्न राज साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावून केला गेला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची गाडी फोडली ती का फोडली तर राऊत यांची टोळी आणि उद्धव – राजा मध्ये आग लावत होती.
आता याच संजय राऊत यांनी पवार कुटुंबात भांडण लावण्याचे काम सुरू केले. त्यावर अजित दादांनी राऊत यांची लायकी दाखवली.
त्याच प्रमाणे आदित्य आणि तेजस ठाकरे या दोन संख्या भावांमध्ये भांडण लावण्यात सुरू केली.युवा सेना प्रमुख म्हणून सरदेसाई चे नाव येतं होते त्या वेळी तेजस ठाकरे ला पुढे आणले आणि दोन्ही भावात भांडणे सुरू केली.त्यामुळे कर्जत च्या फार्महाऊसला तेजस रागाने गेला.
१९९८ मध्ये संजय राऊत ला खासदारकी दिली नाही तेव्हा बाळासाहेबांच्या विरोधात वक्तव्ये केली.बाप लेखाला पोचवतो अशी व्यक्त्याये केलीत त्यावेळी पासून षडयंत्र सुरू केले.
दुसऱ्यांच्या घरात आग लावणे हेच संजय राऊत यांचे कमा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर संजय राऊत ला घरात घेणे बंद करा.असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.
राऊत यांना हिम्मत असेल तर पत्रा चाळीत जावून दाखवावे मग पाहू.बाजार समिती मध्ये ठाकरे सेना ११ वर आली आहे.यात काँगेस,राष्ट्रवादी च्य मदतीने.
भाजपा हा स्वतःच्या तक्तिवर राज्यात एक नंबर वर आहे. संयुक्त लढत हुतात्मे कोण झाले आणि हे हुतात्मे काँग्रेसमुळे पत करावे लागले त्यांच्यासोबत एक मे च्या मेळाव्यात हिम्मत असेल तर काँग्रेस विरुद्ध बोलून दाखवा असे आव्हानही यावेळी आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा