You are currently viewing कै. सूरज राणे यांच्या कुटुंबीयांची सुशांत नाईक यांनी घेतली सांत्वनपर भेट

कै. सूरज राणे यांच्या कुटुंबीयांची सुशांत नाईक यांनी घेतली सांत्वनपर भेट

कै. सूरज राणे यांच्या कुटुंबीयांची सुशांत नाईक यांनी घेतली सांत्वनपर भेट

बोर्डवे गावावर शोककळा; पोस्टमन म्हणून कार्यरत असलेल्या सूरज यांच्या निधनाने मित्रपरिवारात हळहळ

कणकवली :

हळवल येथील कै. सूरज अविनाश राणे यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सूरज राणे हे बोर्डवे गावात पोस्टमन म्हणून कार्यरत होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी बोर्डवे तसेच आजूबाजूच्या दशक्रोशीतील गावांमध्ये मोठा मित्रपरिवार जोडला होता. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

यावेळी भास्कर गावडे, उत्तम लोके, बबली राणे, रोहित राणे, अनंत राणे तसेच राणे कुटुंबीय उपस्थित होते.

कै. सूरज राणे यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना ग्रामदेवता श्री शेवराई-पावणादेवीच्या चरणी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा