हळवल येथील तरुण कलाकार सुरज राणे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन
कणकवली
कणकवली तालुक्यातील हळवल गावातील शिवसेनेचे माजी ग्रा.प. सदस्य, भारतीय डाक विभागातील बोर्डवे येथील पोस्टमन, नामांकित चित्रकार, पोट्रेट रांगोळी कलाकार अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हळवल मधलीवाडी येथील सुरज अविनाश राणे (वय २७) याचा शुक्रवारी राहत्या घराच्या टेरेसवरून तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्याच्या राहत्या घरी भेट देऊन वडील अविनाश राणे व कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.
