You are currently viewing असनियेत बांधकाम कामगार आरोग्य शिबिराचे आयोजन

असनियेत बांधकाम कामगार आरोग्य शिबिराचे आयोजन

*असनियेत बांधकाम कामगार आरोग्य शिबिराचे आयोजन*

*कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

बांदा:-

भाजपा बांधकाम मोर्चा बांदा मंडलच्या पुढाकाराने असनिये येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोलेस्ट्रॉल,थायरॉईड,शुगर यासह रक्ताच्या एकवीस वेगवेगळ्या तपासण्या त्याचप्रमाणे कान,डोळे व फुफ्फुसाची तपासणी केली गेली. तसेच रुग्णांना औषधे देखील लगेचच वितरित करण्यात आली. दोनशे बांधकाम कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बोलताना डॉ. चव्हाण यांनी आरोग्यविषयी काळजी तसेच या योजनेअंतर्गत होणाऱ्या तपासण्या याची माहिती उपस्थितांना दिली. या शिबिरासाठी डॉ. संजय चव्हाण, रीया पाटील – परिचारिका,विशाखा गावडे – (ERT), स्वाती वालावलकर व स्नेहल परब – फ्लेबोटोमिस्ट यांनी आरोग्य सेवा दिली.यावेळी लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड देखील वितरित करण्यात आले.यावेळी असनिये सरपंच रेश्मा सावंत, गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, शरद सावंत, सुमंत असनकर, सुहानी ठीकार,भरत सावंत, दर्शना दामले,ग्रामसेवक मुकुंद परब आदी उपस्थित होते.खेडेगावात अशा पद्धतीचा आरोग्य मेळावा झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
——————————————–
भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून ही फार मोठी योजना राबवली जात आहे.केवळ आरोग्य नव्हे तर शिक्षण, आयुर्विमा,आर्थिक स्थैर्य,राहणीमान,आरोग्यविमा, विनाव्याज कर्ज अशा 32 प्रकारचे फायदे या योजनेमधुन वंचित घटकांना मिळणार आहेत. त्याचा जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घ्यावा.
–श्री गुरु कल्याणकर
भाजपा बांदा मंडल क्रीडा संयोजक,क्रीडा प्रकोष्ठ.
——————————————–
हे अतिशय महत्त्वकांक्षी व लाभदायी योजना असून त्याचा याची माहिती वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत गरजेचे आहे.यासाठीच आजचे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.याचा प्रतिसाद पाहून अशाच प्रकारची शिबिरे यापुढेही भरवण्यात येतील.
–श्री संजय सावंत
भाजपा बांधकाम कामगार मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष.

प्रतिक्रिया व्यक्त करा