You are currently viewing मुंबईतही वाजला अहिराणीचा डंका

मुंबईतही वाजला अहिराणीचा डंका

नवी मुंबई :

कवी कुसुमाग्रज वाचनालय संस्था नेरुळ व महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय साहित्य संमेलन 21 व 22 नोव्हेंबर रोजी तेरणा आॅडीटोरियम  नेरूळ येथे संपन्न झाले.

या संमेलनातील परिसंवाद ” बोलीभाषा सौंदर्य व तिचे साहित्यातील योगदान ” या विषया अंतर्गत , अहिराणी भाषेवर सुपरिचित लेखिका शैलजा करोडे यांनी आपले विचार मांडले .

अहिराणीच्या प्राचीन इतिहासाचा धांडोळा घेऊन अहिराणीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आजची आधुनिक जीवनशैली , शहरीकरण व डिजिटल माध्यमांची मदत घेऊन अहिराणीचा प्रचार , प्रसार वाढविणे तसेच मराठी व इतर भाषेतील साहित्याचाही अहिराणीत अनुवाद व्हावा जेणे करुन भाषेची शब्दसंपत्ती आणि वैचारिक खोली वाढेल .असे शैलजा करोडे यांनी प्रतिपादन केले.

—————————

प्रतिक्रिया व्यक्त करा