You are currently viewing आरपीडी हायस्कुलची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिचा उपशिक्षणाधिकाऱ्यांकडून सत्कार

आरपीडी हायस्कुलची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिचा उपशिक्षणाधिकाऱ्यांकडून सत्कार

सावंतवाडी

वर्षभरात 25 हून अधिक वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत पारितोषिके पटकवणाऱ्या आरपीडी हायस्कुलची पाचवी ची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिच्या स्पृहणीय यशाची दखल घेत उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी तिचा खास गौरव केला. सावंतवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता अस्मिच्या यशाची दखल घेत तिचा सत्कार… करून पुढे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व प्रेरणा दिली यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ कल्पना बोडके, अस्मिची आई प्रा सुषमा प्रवीण मांजरेकर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी आंगणे म्हणाले 64 कलांमध्ये वक्तृत्व कला ही श्रेष्ठ कला म्हटली जाते एखाद्याचे बोलणे ऐकत रहावे, असे ऐकणाऱ्याला वाटते तेच खरे वक्तृत्व असते असे सांगून पुढील काळ हा अस्मिचाच असेल असे गौरोदगार काढले यावेळी गटशिक्षणाधिकारी बोडके म्हणाल्या अस्मि ही सावंतवाडी जि प शाळा नं दोनची माजी विद्यार्थीनी आहे आज आरपीडी शाळेंत तिची कला बहरली तरी या कलेचे बाळकडू तिला जि प शाळेतच मिळाले, असे सांगितले.अस्मि हिने वर्षभरात ऑनलाईन, ऑफलाईन राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय. तालुकास्तरीय कथाकथन, वक्तृत्व, कथा अभिवाचन अशा विविध स्पर्धेत 25 हून अधिक पारितोषिके पटकवली आहेत

महाराष्ट्र डॉट com असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथा अभिवाचन स्पर्धा, अटल प्रतिष्ठान आयोजित खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, मालवण नाथ पै सेवांगण आयोजित कथावाचन स्पर्धा, छत्रपती सेवा प्रतिष्ठान माणगाव आयोजित ऐतिहासिक कथाकथन स्पर्धा, उमेद फाउंडेशन आयोजित कथाकथन स्पर्धा, किशोर मासिक आयोजित कथाकथन स्पर्धा, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी आयोजित कथाकथन स्पर्धा या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर सावंतवाडी तालुका मराठा शिक्षक संघटना आयोजित कथाकथन स्पर्धेत द्वितीय तर बांदा नट वाचनालय आयोजित कथाकथन व मळगाव वाचनालय आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला याशिवाय बॅ नाथ पै सेवांगण मालवणच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा शाळा अंतर्गत स्पर्धा व अन्य ऑनलाईन स्पर्धा अशा विविध 25 हून अधिक स्पर्धेत अस्मीने वर्षभरात यश संपादन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fifteen =