You are currently viewing सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून या दौरा प्रसंगी आयोजीत कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण यांचे ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८:३० ला कुडाळ येथे कोकणकन्याने आगमन, १० ते १०:३० लोकप्रतिनिधी बैठक स्थळ :कलेक्टर ऑफिस,१०:३० ते ११:३० कलेक्टर ऑफिस येथे आढावा बैठक,११:३० ते १२:३० सावंतवाडी विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक, १२:३०ते १:३० कुडाळ विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक वरील दोन्ही बैठका वसंतस्मृती कार्यालय ओरोस येथे होतील. १:३० ते २:३० राखीव २:३० ते ३:३० कणकवली विधानसभा भाजपा प्रमुख पदाधिकारी समवेत आढावा बैठक भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे होईल. तरी भाजपा सर्व पदाधिकारी यांनी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० ला कुडाळ रेल्वे स्थानक येथे स्वागतासाठी व वरील संघटनात्मक बैठकीना उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =