You are currently viewing निमित्त व्हॅलेंटाइन डे

निमित्त व्हॅलेंटाइन डे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निमित्त व्हॅलेंटाइन डे*

 

कर बाबा कर

प्रेम कर

बायकोवर कर

नाहीतर

प्रेयसीवर कर

आज तुझा हक्काचा दिवस

फेब्रुवारी चा दुसरा सोमवार

व्हॅलेंटाइन आठवुन आठवुन स्मर

एका दिवसांकरता का होईना

पण प्रेम मात्र तेवढं कर

कर बाबा कर

तू

प्रेम कर. ..

 

आमचं काय

आम्ही तर रोजच करतो

जन्मदात्यांच्या ममतेवर

आप्तस्वकियांच्या नातेसंबंधावर

एकमेकांच्या विश्वासावर

धरती मातेच्या कृपाछत्रावर

देशप्रेम देशभक्तीने ओतप्रोत

जन्मभूमीवर

चराचरातल्या

चल अचल घटकांवर

जन गणांवर

प्राणीमात्रांवर

जनावरांवर पशुपक्षी

निर्मल जलावर

वृक्षवल्ली पानाफुलांवर

इथल्या दगडधोंड्यांवर

लोचट गिधाडांवरही

प्रेम रोजच करतो

प्रेम करणे हा

आमचा स्वभावच आहे

 

तू मात्र

त्या व्हॅलेंटाइनला स्मरून

एका दिवसापुरता का होईना

प्रेम कर

बायको वर कर

नाहीतर प्रेयसीवर कर

कर बाबा कर

प्रेम कर

आज निमित्त

व्हॅलेंटाइन डे आहे

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

8208667477.

7588318543.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा