जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस
*लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार सोहळा संपन्न*
पिंपरी (दिनांक : २१ नोव्हेंबर २०२६)
‘जगाला शांतता आणि सारासार विवेकाची नितांत गरज असून सामाजिक समता, सौहार्द अन् ज्ञानाचे प्रतीक असलेल्या लोकशिक्षक बाबा भारती यांच्या विचारांचे कृतिशील उपक्रम म्हणजे त्यादृष्टीने टाकलेले पाऊल आहे!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार, लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डाॅ. अशोककुमार पगारिया, पाली भाषा प्रचारक ॲड. आनंदा कांबळे, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी रयत शिक्षण संस्था महाविद्यालय विकास समिती चेअरमन संजोग वाघेरे पाटील यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर उद्योजक बाळासाहेब वाघेरे पाटील यांना लोकशिक्षक बाबा भारती समाजभूषण पुरस्कार; तसेच डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी आर्ट्स, काॅमर्स अँड सायन्स काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विश्वास देशमुख, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ प्राचार्य डाॅ. भीम गायकवाड आणि सहायक कुलसचिव डाॅ. शिवाजी शिंदे यांना लोकशिक्षक बाबा भारती शिक्षकप्रतिभा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, भाऊसाहेब भोईर यांनी, ‘सामाजिक क्षेत्रात वैचारिक अपंगत्व आले असून काही मोजकेच कार्यक्रम कौतुकास्पद आहेत!’ असे मत व्यक्त केले. डाॅ. अशोककुमार पगारिया यांनी, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सातत्याने एकोणीस महिने विविध उपक्रम राबविणाऱ्या बाबा भारती प्रतिष्ठानच्या कार्याची दखल लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डने घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ॲड. आनंदा कांबळे यांनी ‘महामंगल सुत्त’ याविषयी विवेचन केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संजोग वाघेरे पाटील यांनी, ‘पाली भाषेचे शब्दकोशकार बाबा भारती यांच्या नावाचा पुरस्कार लोकसेवेचे प्रतीक म्हणून स्वीकारताना आनंद वाटतो’ , अशी भावना व्यक्त केली. डाॅ. विश्वास देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे मी पुरस्कारापर्यंत पोहोचलो, अशी कृतज्ञता व्यक्त केली; तर डाॅ. भीम गायकवाड यांनी “तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा…” या गीताचे सुरेल सादरीकरण केले.
प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून बाबा भारती यांच्या कार्याची आणि एकोणीस वर्षांपासून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुरुषोत्तम सदाफुले, रवींद्र भारती, प्रकाश कांबळे, निमिष भारती, विजय कांबळे, आर. के. कांबळे, शार्दूल भारती, अमोल ढाले, अप्पा देशमुख, जय भारती, प्रशांत दीक्षित, हंबीरराव पाटील, मारुती सोलंकर, अनिकेत गाडे, अभिजित भोसले, प्रा. डाॅ. संग्राम गोसावी यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
