You are currently viewing सिंधुदुर्ग पोलिस दलातील मुकुंद उर्फ दर्शन सावंत यांना पोलिस महासंचालक पदक

सिंधुदुर्ग पोलिस दलातील मुकुंद उर्फ दर्शन सावंत यांना पोलिस महासंचालक पदक

*महाराष्ट्र दिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव*

 

सिंधुदुर्ग पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यात मुकुंद उर्फ दर्शन सावंत यांचादेखील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला आहे. आज महाराष्ट्र दिन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.

दर्शन उर्फ मुकुंद सावंत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून महाराष्ट्र पोलीस म्हणून गेली दोन दशके सेवा बजावत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस म्हणून जबाबदारी पार पाडताना अत्यंत प्रामाणिकपणे पोलीस खात्याला अभिमान वाटावा अशीच कामगिरी आजपर्यंत त्यांच्याकडून घडलेली आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणून आपली जबाबदारी चौख बजावणाऱ्या मुकुंद उर्फ दर्शन सावंत यांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. भविष्यातही मुकुंद उर्फ दर्शन सावंत यांच्याकडून अशीच उल्लेखनीय कामगिरी घडावी आणि महाराष्ट्र पोलिस दलाची आन-बान शान जपली जावी अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =