You are currently viewing कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘एक दिवस छोट्यांचा’ खाऊगल्ली महोत्सव!

समीर नलावडे मित्रमंडळाचा आठवा उपक्रम; एक हजार मुलांना ५० रुपयांचे मोफत खाऊ कूपन, जादूचे प्रयोग आणि मनोरंजनाची मेजवानी

कणकवली :

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात येणारा ‘एक दिवस छोट्यांचा’ हा खाऊगल्ली व मनोरंजनात्मक कार्यक्रम रविवार, २९ नोव्हेंबर रोजी गणपतीसाना येथे रंगणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ११ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेली आठ वर्षे आयोजित होणाऱ्या या उपक्रमात यंदा मुंबईतील जादूगारांचे विशेष प्रयोग, ऑर्केस्ट्रा, कार्टून पात्रे, सेल्फी पॉईंट, प्रश्नमंजुषा आणि आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक हजार मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे मोफत खाऊ कूपन देण्यात येणार आहे. चॉकलेटचा भव्य बॉक्स उघडून अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले जाणार असून, त्यातील विशेष कूपन मिळवणाऱ्या मुलांना भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.

खाऊगल्लीमध्ये स्टॉल लावण्यासाठी स्थानिक बचतगट, दुकानदार आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना मोफत जागा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक बंडू हर्णे, संजय कामतेकर, राजा पाटकर, अमोल रासम, पंकज पेडणेकर, प्रज्वल वर्दम, राज नलावडे, सागर होडावडेकर, ऋतिक नलावडे आदी उपस्थित होते.

लहान मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी आयोजित या उपक्रमात पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा