प्राधिकरण निगडी -दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व मधुमेह रूग्ण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दादा दादी विरंगुळा केंद्र याठिकाणी संध्याकाळी जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला.
सौ आशा नष्टे यांनी स्वागत गीत सादर केले.डॉ.अनु गायकवाड मधुमेह तज्ञ यांचा सत्कार डॉ. दिगंबर इंगोले मधुमेह रूग्ण संघटनेचे अध्यक्ष यांनी केला. तसेच,डॉ. दिगंबर इंगोले व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी यांचा सत्कार डॉ.अनु गायकवाड यांनी केला.
लायन्स क्लब निगडी, पुणेच्या अध्यक्षा सौ.शिल्पी कुमार यांनी मधुमेह रुग्ण संघटनेला लायन्स क्लब तर्फे व्हील चेअर भेट दिली.त्यांचा सत्कार डॉ.ज्योती इंगोले यांनी केला.डॉ.दिगंबर इंगोले यांनी प्रास्ताविक व श्री.चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ मधुमेह तज्ञ, डॉ.अनु गायकवाड यांचा परिचय श्री.मनोहर जोशी यांनी करून दिला.त्यानंतर डॉ.अनु गायकवाड यांनी मधुमेहा बाबत अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. .मधुमेह म्हणजे काय ?त्याची लक्षणे, मधुमेहाचे प्रकार ,त्यामुळे होणारी गंभीर गुंतागुंत जसे उच्च रक्तदाब,हृदय विकार, मोतीबिंदू,मेंदू व त्वचा विकार, हे टाळण्याकरता दररोज अर्धा तास व्यायाम,आहार विहार , हिरव्या पालेभाज्या,तंतुयुक्त अन्नपदार्थ,फळे यांचा आहारात समावेश असावा. तसेच नियमित तपासणी करावी असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चांदबी सय्यद यांनी केले त्यांचा सत्कार डॉ. रजनी जैन यांनी केला.कोषाध्यक्ष श्री.नरेंद्र मिसाळ यांनी आभार मानले.
