(मृणालिनी भाभे, निशिकांत मुपीड, प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण )
धाराशिव :
आपले आयुष्य हे केवळ बँकिंग क्षेत्रातील नोकरीपुरते मर्यादित राहिलेले नव्हते, तर ते ग्रामीण भारताच्या विकासासाठी समर्पित असलेले एक अखंड सेवाव्रत होते.सन 1975-76 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सेवेला प्रारंभ केल्यानंतर पुढे नाबार्डमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक या पदापर्यत कार्य केले.
*धाराशिव जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहाला मिळालेली उभारी धाराशिव जिल्हा विसरणार नाही*
धाराशिव येथे जिल्हा विकास प्रबंधक म्हणून काम करताना तसेच मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद येथील कार्यकाळात स्वयंसेवी संस्था, बँका आणि ग्रामीण समुदाय यांच्या मदतीने राष्ट्रहिताच्या विकासकार्याला चालना मिळाली.
नाबार्डच्या माध्यमातून, सुमारे 3,000 स्वयंसहायता समूहामधील 60,000 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, शेतकऱ्यांच्या संयुक्त दायित्व गटांच्या निर्मितीसाठी, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी आणि बँकांच्या बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान मिळाले हजारो महिलांना रोजगार मिळवून देणारे काम, शेतकऱ्यांच्या जीवनाला नवी दिशा आणि ग्रामीण विकासाला संस्थात्मक आधार देणारे श्रीकांत भावे यांना महाराष्ट्र लोक विकास मंचच्या मार्फत दहा डिसेंबर 2026 रोजी कळंब जिल्हा धाराशिव येथे महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विश्वनाथ (अण्णा) तोडकर, राष्ट्रीय सचिव भूमिपुत्र वाघ यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
