You are currently viewing भोम पुनर्वसन गावठाणातील धबधबा लक्षवेधी

भोम पुनर्वसन गावठाणातील धबधबा लक्षवेधी

वैभववाडी :

भोम पुनर्वसन गावठाणात ग्रामस्थांनी गणपती विसर्जनासाठी छोटा तलाव तयार केला आहे. सध्या या तलावात डोंगरातून उंचावरुन धबधबा ओसंडून वाहात आहे. पुनर्वसनातील बच्चे कंपनी या धबधब्याचा आनंद लुटत आहेत. भोम पुनर्वसन गावठाणात गावठाणातील ग्रामस्थांनी एकत्र येत गणपती विसर्जनासाठी एक छोटे कृत्रिम तलाव तयार केले आहे. तिन्ही बाजूने भिंत बांधून तलावात पाणी साठा केला आहे. गेल्या वर्षीपासून गावठाणातील गणपती विसर्जन याठिकाणी केले जात आहे. अरुणा धरण समितीचे सचिव डॉ. जगन्नाथ जामदार यांच्या संकल्पनेतून हा कृत्रिम तलाव करण्यात आला आहे. या तलावात डोंगरातून उंचावरुन सध्या धबधबा ओसंडून वाहत आहे. हा धबधबा बच्चे कंपनी तलावात मनसोक्त डुबक्या मारणे व धबधब्याखाली अंघोळ करीत मौजमजा करण्याचे ठिकाण बनले आहे. तलावाच्या बाजूला पत्र्याच्या शेडही उभारण्यात आली आहे. गणपती विसर्जन करताच या ठिकाणी गणपती ठेवून पूजा आरती केली जाते. उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र हा पुनर्वसन गावठाणातील आकर्षण ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा