जिल्हा काँग्रेसची उद्या सभा

जिल्हा काँग्रेसची उद्या सभा

जिल्हा काँग्रेसची उद्या सभा

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीची सभा ४ सप्टेंबर ला सकाळी १०:३० वाजता काँग्रेस जिल्हा कार्यालय आओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये विभागीय अध्यक्ष, उपविभागीय अध्यक्ष नियुक्त करणे ग्राम समिती अध्यक्ष नियुक्ती व पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे.

जिल्हा काँग्रेस समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व प्रदेश प्रतिनिधी, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी-माजी खासदार व आमदार, पक्षाचे लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, माजी जिल्हाध्यक्ष, फंटल विभागाचे व विविध सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा