You are currently viewing उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ओरोस येथे मंगळवारी जिल्हा बँक कार्यालय येथे बैठक

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ओरोस येथे मंगळवारी जिल्हा बँक कार्यालय येथे बैठक

उस उत्पादक शेतक-यांशी अडअडचणी सोडवण्यासाठी ओरोस येथे मंगळवारी सकाळी ११वाजता जिल्हा बँक प्रधान कार्यालय येथे बैठक

डी वाय पाटील साखर कारखाना अधिकारी रहाणार उपस्थित

सिंधुदुर्गनगरी

उस पीक वाहतुकीचा व उस तोडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच उसपीक हंगाम दिड दोन महीन्यात संपणार असुन त्या अगोदर उस तोडला गेला नाही तर उस पीक शेतक-यांचे नुकसान होणार आहे. याबाबत उस उत्पादक शेतक-यांशी अडअडचणी सोडवण्यासाठी ओरोस येथे मंगळवारी सकाळी ११वाजता जिल्हा बँक प्रधान कार्यालय येथे बैठकआयोजीत करण्यात आली आहे.या बैठकीस जिल्हा
बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर तसेच डी वाय पाटील साखर कारखाना अधिकारी रहाणार उपस्थित रहाणार आहेत. जिल्हा बँक प्रधान कार्यालय येथील बैठकीस जिल्ह्यातील उसपीक शेतक-यानी उपस्थित रहावे असे आवाहन जि ल्हा बँक अध्यश व उपाध्यश यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उस उत्पादकांच्या प्रश्ना बाबात चर्चा करण्यात येणार आहे करूळ व भुईबावडा हे दोन्ही घाट रस्ते खड्डे पडल्याने खराब झाले आहेत उस पीक नेणारी वाहने पलटी होत आहेत .वाहन चालक उस नेण्यास तयार नाहीत उस तोडी साठी कामगार येत नाहीत. उस सुकुन चालला आहे.
या सर्वांवर तुर्तास तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =