You are currently viewing मन माझे….
Oplus_16908288

मन माझे….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन माझे..*

 

नित्य करी खळखळ

मनमाझे अचपळ

मन उधळ उधळ

ना आवरे हो मला…

 

मन आकाशहेगंगा

मन आहे नाना रंगा

करी रात्रंदिन दंगा

व्यापार सदा खुला..

 

मन (पक्षी)उडतउडत

नाही होत अवगत

लावी ते कलागत

खळबळ गलबला..

 

मन रूप गंध रस

नेहमीच फसफस

नित्य लावितसे कस

त्याच्या नाना कला…

 

मन इंद्राचे धनुष्य

मन जीवनाचे भाष्य

पण लावी कधी फास

करी जीव अर्धमेला..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा