सावंतवाडी तालुका काँग्रेसतर्फे बालदिनानिमित्त पंडित नेहरूंना अभिवादन
राजेंद्र मसुरकर यांच्या कार्यालयात प्रतिमेस पुष्पांजली; नेहरूंच्या देशासाठीच्या योगदानाला उजाळा
सावंतवाडी :
भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी राजेंद्र मसुरकर यांनी नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून केलेले कार्य, आधुनिक भारताच्या उभारणीत बजावलेली भूमिका तसेच बालदिनाचे महत्त्व याविषयी उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती दिली.
पंडित नेहरू यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिन देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी अजय मालवणकर, रविंद्र म्हापसेकर, विष्णू पेडणेकर, संतोष कासकर, पीटर फर्नांडिस, आफतान हेरेकर, सुधीर मल्हार, संदीप सुकी, संतोष तावडे, कौस्तुभ पेडणेकर, अॅड. समीर वंजारी, बाळा नमशी आणि विनायक नमशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
