वैद्यकीय रिपोर्ट उशिरा मिळत असल्याबाबत ग्रामपंचायत सदस्य तथा वैभववाडी तालुका भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे वेधले लक्ष…

वैद्यकीय रिपोर्ट उशिरा मिळत असल्याबाबत ग्रामपंचायत सदस्य तथा वैभववाडी तालुका भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे वेधले लक्ष…

वैभववाडी

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे येथे स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. या कोविड स्वॅब टेस्टचे रिपोर्ट किमान तीन दिवसा मध्ये भेटणे अपेक्षित आहेत. पण तसे न होता ग्रामस्थांच्या कोविड स्वॅब टेस्टचे रिपोर्ट तेही फक्त पॉझिटिव रुग्णांचे रिपोर्ट आठ दिवसाने तोंडी स्वरूपात कळवण्यात येत आहेत… असे का…? असा सवाल उपस्थित करत प्रा. आ.केंद्र सडूरे वैभववाडी मध्ये घेत असलेल्या कोवीड स्वॅब टेस्टचे रिपोर्ट प्रिंटआउट न मिळणे व रिपोर्ट उशिरा मिळत असले बाबत ग्रामपंचायत सदस्य तथा वैभववाडी तालुका भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे वेधले लक्ष.
काळे आपल्या निवेदनात पुढे म्हणाले,  जास्तीत जास्त तीन दिवसाच्या कालावधीत हे रिपोर्ट मिळणे अपेक्षित असते. त्यात आपल्या विभागाकडून स्वॅब टेस्ट घेतलेल्या व्यक्तींना प्रिंट आउट रिपोर्ट देणे अत्यंत गरजेचे आहे. पण ते आपल्या विभागाकडून मिळत नाहीत. वैभववाडी तालुक्यामध्ये कुठेही प्रायव्हेट लॅबला स्वॅब टेस्ट होत नाहीत. पंचक्रोशीतील गावामधील बहुतांश बँकेमध्ये, शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा शासकीय विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना निगेटिव रिपोर्ट आपल्या विभागाला दाखवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कामावरती घेतलं जात नाही. काही ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन देखील निगेटिव्ह रिपोर्ट ची मागणी करत आहे. निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच लग्नकार्याला इतर कोणत्याही कार्याला कोविड स्वॅब टेस्ट निगेटिव असलेल्या रिपोर्टची अट घालून कार्यक्रमाना हरकत दाखला देण्यात येत आहेत.
त्यामुळे या ग्रामस्थना आपआपल्या विभागांमध्ये रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. तरी माझी आपल्याकडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे, की, प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे जो व्यक्ती स्वॅब देतोय त्याला किमान तीन दिवसाच्या आत रिपोर्ट उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून त्या ग्रामस्थांची अडचण दूर होईल. रिपोर्ट लवकर मिळाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यास आम्हाला देखील वेळ भेटेल. वरील सर्व मागण्या आपल्या माध्यमातून पूर्ण करून मिळाव्या व त्या मागण्या आपण मान्य कराव्यात. तसेच आरोग्य यंत्रणेला माझे संपूर्ण सहकार्य असेल असा शब्द नवलराज काळे यांनी आरोग्य यंत्रणेला दिला.
सदर निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे वैभववाडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका बंडगर यांच्याकडे सुपूर्द करताना सडूरे शिराळे ग्रा.प. सदस्य तथा भा ज पा यूवा मोर्चा चे वैभववाडी तालुका सरचिटणीस श्री. नवलराज विजयसिंह काळे यांच्यासोबत शिराळे भाजपा युवा मोर्चा बूथ अध्यक्ष संकेत शरद पाटील, ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहीत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, तालुका तहसीलदार वैभववाडी, तालुका आरोग्य अधिकारी वैभववाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे वैभववाडी यांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा