You are currently viewing अरे..संसार.. संसार !
Oplus_16908288

अरे..संसार.. संसार !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अरे..संसार.. संसार !*

 

भांड्याच्या हरएक खोच्यामागे

एक छोटसं महाभारत दडलं असतं

भांड्याला भांड लागलं की झाकून

सांगायचं…हेच खरं लग्न असत..!

 

रोजच भविष्य पेपरांत वाचण्याची

तशी गरज. ….कधीच नसते

तिच्या डोळ्यांतच दिवस भराचं

भविष्य तुमचं……दडले असते ..!

 

सकाळी ..चेहरा बघतांच

दिनक्रम आपोआप ठरला जातो

रात्रीच्या ….जेवणांतच

सकाळचा नाश्ता दडला असतो .!

 

सवयीने संसाराची भीती नाहीशी होते

कुकरच्या शिटीची भीती वाटायला

लागते…

माजघराच्या दशहतीने नको वाटणारेही मुकाट्याने… खावे लागते …!

 

संसार संसार…अरे जसा चुल्यावर

सोबतच जगणं.. कायम गॅसवरच

रूसवे फुगवे काढत..म्हणायचं असतं

न जुळणारे एकत्र येणं!हेच लग्न असतं

 

मित्रांनो! संसार ज्यांचा सुखाचा असतो

त्या बायकांचं ..सर्वात करमणुकीचं

साधन तिचा नवरा असतो ….!!**

अजून करमणूक असते तरी काय..

तुम्हीही सहभागी व्हा..आनंदी व्हा

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा