You are currently viewing जुना ता सोना..

जुना ता सोना..

*लक्ष्मण उर्फ प्रकाश धोंडी सरमळकर**ग्रामसेवक ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी ता.मालवण येथे कार्यरत कविता व इतर सामाजिक विषयांवर लिखाणाची आवड*

जुना ता सोना..

अच्छर पावशेर शेर,पायली

आणि कुडू🌷

बाबारे जुना ता सोना

त्याका नको सोडू🍀

डीप्ळो इर्ला कर्ला नी कांबळा

पळीव जगाल नी ईशाड⚫

कोळसा गुठो नी जातो🌴

गवताची कुंडी नी भाताची मुढी🌞

वालय,बेळो नी पाटणी

उडीद कुळीथ नाचणी

करुक व्हयी भात कापणी🤢

आकडी कोयतो कोयती नी खोरा

गोठ्यात हाबांरतत डॉरा

पेंज नी खोबरा

पिठी नी भात🌾

खारातलो आंबो,खारातलो आंबाडो

नी मिरचे🌶️

घावणे नी पोळये खावचे

आवशीच्चा हातचे🔻

रवळी, पडली आणि झाप

टोपली,कणग नी डाळी

दारात आसतत खळी 🙇

फणस रतांबे फोफणीसा

नी रायवळ आंबे🌴

जांभळा करंदा नी काजी

जडे बघुचा तडे दिसता 4 G😁

बसकणेर जावची मळली वाट

लवकर ये काढूक व्हयी लाठ

पाटलण पटकुर नी चप्पल टायराचा

सांबारा खावचा तर काळ्या वाटाण्याचा

काळुंद्रा,खर्चा नी ठीगुर

शेंगठी काढय नी खवळो🐟

सुको बांगडो नी नाचण्याची भाकरी

शेती करा रे करू नको कोणाची चाकरी

करू नको कोणाची चाकरी

 

*लक्ष्मण उर्फ प्रकाश सरमळकर✍️*

ग्रामसेवक ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी ता.मालवण

95450 06839

 

प्रतिक्रिया व्यक्त करा