You are currently viewing कुडाळचा आदित्य सायकलने सर करणार रायगडच्या पायऱ्या

कुडाळचा आदित्य सायकलने सर करणार रायगडच्या पायऱ्या

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील आदित्य बटावले यांनी चक्क सायकलने किल्ले फिरून छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्याची नवीन मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी आदित्य रांगणा किल्ला सायकलने सर करून संपूर्ण तट सायकलने फिरवून आपल्या मोहिमेस प्रारंभ केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी बोटी च्या सहायाने सोबत सायकल घेवून पोचला व सिंधुदुर्ग किल्ला सायकलने फिरून वेगळा ईतिहास रचला आहे, ही आपल्या सर्वांना अभिनानाची गोष्ट आहे.

आदित्य आता रायगड किल्ल्याची मोहीम हाती घेत आहे. १७३७ किल्ल्याच्या पायऱ्या चक्क सायकल सोबत सर करणार आहे व संपूर्ण रायगड किल्ल्याचा तट सायकलने पूर्ण करून महाराजांना अनोख्या पद्धतीने मुजरा देऊन अतुलनीय असा विक्रम रचणार आहे. आदित्य या मोहिमेसाठी सज्ज झालेला आहे. उद्या ३० एप्रिल रोजी सकाळी रायगड किल्ला सर करणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा