You are currently viewing सोयी नुसार काशी ….

सोयी नुसार काशी ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सोयी नुसार काशी ….*

माणूस आहे फार बिलंदर सोयी नुसार काशी
रोजच खाई सारे तुपाशी तरीही म्हणतो उपाशी…
माणूस आहे फार बिलंदर…

गुरफरतो इतका संसारी भान न त्याला उरते
किती ही साठले तरीही त्याला सारे कमीच पडते
अजून पाहिजे अजून पाहिजे किती ही जमल्या राशी…
माणूस आहे फार बिलंदर…

आयु जाते निघून सारी ओझी वाहून दमतो
पुढच्या पिढीची चिंता करूनी पुन:श्च जुंपून घेतो
श्वास घ्यावया फुरसत नाही कमीच त्या धन राशी
माणूस आहे फार बिलंदर …

व्याधी जडता आठवतो मग त्यास पहा परमात्मा
चिंतेचे गाठोडे घेऊन करतो मग तो यात्रा
स्वस्थता न पण मिळे जीवाला कुठे शिंकली माशी…
माणूस आहे फार बिलंदर…

स्वार्थासाठी नित्यच धरतो देवाला वेठीस
हे होऊ दे ते होऊ दे मग येईन भेटीस
कामा पुरता मामा त्याचा रीतच त्याची खाशी..
माणूस आहे फार बिलंदर…

प्रत्येकच माणूस परमात्मा देवाचा तो अंश
भ्रष्ट मती अन् दुर्बुद्धीने बनून जातो “कंस”
मन चंगा तो मनात गंगा मनात आहे काशी…
माणूस आहे फार बिलंदर सोयीनुसार जाशी…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ९ डिसेंबर २०२३
वेळ: सकाळी: १०/५७

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा