You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये आकाशकंदील , चांदण्या, पणत्या, फराळ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात संपन्न!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये आकाशकंदील , चांदण्या, पणत्या, फराळ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात संपन्न!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये आकाशकंदील , चांदण्या, पणत्या, फराळ प्रदर्शन व विक्री उपक्रम उत्साहात संपन्न!

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे गुरूवार दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीनिमित्त आकाशकंदील, चांदण्या, पणत्या व दिवाळी फराळ यांच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता तिसरी ते दहावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आपल्या कल्पकतेला वाव देत विविध आकारांचे, प्रकारांचे आणि रंगांचे आकर्षक आकाशकंदील व चांदण्या तयार केल्या होत्या. तसेच मातीच्या पणत्यांना सुंदर रंगकाम व नक्षीकाम करून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या वस्तू ग्राहकांसाठी रास्त दरात विक्रीस उपलब्ध करून दिल्या होत्या.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्वतःच्या कला-कौशल्याच्या बळावर काहीतरी निर्माण करणे, त्यातून आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळवणे आणि अर्थार्जनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, या उद्देशाने ‘शिका आणि कमवा’ (Learn and Earn) या तत्त्वावर आधारित हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
याचबरोबर शाळेतील पालकांनी तयार केलेले स्वादिष्ट व रुचकर घरगुती दिवाळी फराळाचे पदार्थही प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला बहुसंख्य पालक व इतर ग्राहकांनी भेट देऊन वस्तूंची, पदार्थांची खरेदी केली.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, उद्योजकतेला आणि स्वावलंबनाच्या वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला सर्वांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद लाभला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा