You are currently viewing महिलांनी ध्येय निश्चित करून काम केल्यास यश निश्चित – स्मिता नलावडे

महिलांनी ध्येय निश्चित करून काम केल्यास यश निश्चित – स्मिता नलावडे

असलदे ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त स्पर्धांच्या विजेत्यांचा गौरव

कणकवली

असलदे गावात ३६ बचतगट आहेत, महिलांना संघटीत केलं जातं आहे.ही चांगली गोष्ट आहे.असलदे ग्रामपंचायतने महिला दिनानिमित्त चांगले कार्यक्रम आयोजित केले,त्याबद्दल सरपंच पंढरी वायगंणकर यांचे कौतुक आहे.असलदे गावाचे दिविजा वृद्धाश्रमाने नावलौकिक वाढवले आहे.त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ध्येय निश्चित केले,तरच यश निश्चित आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचा सर्व शिक्षा अभियानाच्या स्मिता नलावडे यांनी केले. असलदे ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, स्वस्तीक फाऊंडेशनच्या अध्यक्षा दीपिका राबाडे,सरपंच पंढरी वायगंणकर,सोसायटी चेअरमन भगवान लोके,उपसरपंच संतोष परब, माजी चेअरमन प्रकाश परब,ओटव सरपंच हेमंत परुळेकर,संचालक दिनकर दळवी,ग्रामपंचायत सदस्य वंदना हडकर,सचिता नरे,निलिमा तांबे,प्रतिभा खरात,पोलीस पाटील सावित्री पाताडे,ग्रामसेवक आर. डी. सावंत, कर्मचारी मधुसूदन परब,दळवी,वाळके, घाडी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले,८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे,हा दिवस महिलांच्या सन्मानाचा आहे.या निमित्ताने असलदे सरपंच पंढरी वायगंणकर यांनी कणकवली शहराप्रमाणे महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.गावातील महिलांना चांगला सहभाग घेतला.त्यामुळे पुढील काळात असे कार्यक्रम होण्यासाठी त्याच्या नेतृत्वाला साथ देण्याचे काम आपण केले पाहिजे. ओटव सरपंच हेमंत परुळेकर म्हणाले, महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन काम केल्यास प्रगती आहे.असलदे सरपंच वायंगणकर चांगले काम करत आहेत.उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभे राहिल्यास आपण सर्वांनी पाठीशी रहावे,तरच गावाची प्रगती आहे. जरी मी इच्छुक असलो तरी माझा पुतण्या म्हणून मी पाठीशी राहीन. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोव्हिड कालावधीत विशेष कार्य केल्याबद्दल आशा सेविका भाग्यश्री नरे यांचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम सौ.पूर्वा फोंडके,द्वितीय प्रदोदिनी लोके,तृतीय आशा घाडी व पाककला स्पर्धा विजेत्या-प्रथम स्नेहा पोकळे,द्वितीय रोहिणी मालवणकर, तृतीय वेदिका फ़ोडके यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सहभागी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी “खेळ पैठणीचा” ही स्पर्धा घेण्यात आली,ही स्पर्धा सरपंच पंढरी वायगंणकर यांनी पुरस्कृत केली.त्यात प्रथम विजेत्या कोमल परब,द्वितीय विजेत्या स्नेहा पोकळे,तृतीय विजेत्या प्रमोदींनी लोके यांना पैठणी देत गौरविण्यात आले. महिला दिनानिमित्त दोन दिवस आयोजित विविध स्पर्धाचे असलदे गावठणवाडी मुख्याध्यापक वृषाली मसुरकर, असलदे मधलीवाडी सुरेखा सावंत व मुख्याध्यापक शांताराम जंगले यांनी परीक्षनाचे काम केले.या कार्यक्रमात गावातील १६० महिलांनी सहभाग घेतला. त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला.मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केलं,तर सूत्रसंचालन सानिका तांबे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा