You are currently viewing जिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानकारक टीकेचा कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध; कामबंद आंदोलनाचा इशारा!

जिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानकारक टीकेचा कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध; कामबंद आंदोलनाचा इशारा!

जिल्हाधिकाऱ्यांच्या अवमानकारक टीकेचा कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध; कामबंद आंदोलनाचा इशारा!

जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ सरकारी कर्मचारी एकवटले; प्रशासनाला निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :

जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्‍या अवमानकारक, व्यंगात्मक व दिशाभूल करणाऱ्या टीका-टिप्पणीचा राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार कार्य करीत असतात.

अशा जबाबदारीच्या वैधानिक पदावर कार्यरत असलेल्या जिल्हाधिकारी महोदयांविरोधात अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यंगचित्रे, उपरोधिक मजकूर व वैयक्तिक स्वरूपाच्या टीका-टिप्पण्यांचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या कामकाजाबाबत मतभेद असणे, त्रुटी निदर्शनास आणून देणे अथवा लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची प्रतिष्ठा, पदाची गरिमा आणि प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान यांचे भान राखणे तितकेच आवश्यक आहे.

विशेषतः महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेला उपोषण व सत्याग्रहाचा मार्ग हा अन्यायाविरुद्ध शांततामय, संयमी व नैतिक पद्धतीने लढा देण्याचे प्रभावी साधन आहे. मात्र, अशा पवित्र मार्गाचा वापर प्रशासकीय अधिकारी यांचेविरुध्‍द वैयक्तिक टीका, उपहास, प्रसिद्धी मिळविणे किंवा प्रतिमा मलिन करण्यासाठी होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

आम्ही लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि प्रशासनावर विधायक टीका करण्याच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतो. परंतु टीका ही वस्तुस्थितीवर आधारित, सभ्य आणि रचनात्मक असावी. कोणत्याही अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला जाणीवपूर्वक धक्का पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींचे आम्ही तीव्र शब्दांत निषेध करित आहोत.

भविष्‍यात जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक वैयक्तिक स्‍वरुपाची अवमानकारक वक्तव्ये, बदनामीकारक व्यंगचित्रे, टीका-टिप्पणी किंवा प्रशासकीय यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण करणारे प्रकार घडल्यास सिंधुदुर्ग जिल्‍हयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग ते खपवून घेणार नाहीत.

अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटना एकत्र येऊन संघटितपणे आपला तीव्र निषेध नोंदवतील. तसेच संबंधित प्रकाराच्या गांभीर्यानुसार लोकशाही व कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन, निदर्शने, काळ्या फिती लावून कामकाज करणे, निषेध सभा तसेच आवश्यकतेनुसार नियमानुसार कामबंद आंदोलन यांसारख्या आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करण्यास अधिकारी व कर्मचारी वर्ग मागेपुढे पाहणार नाहीत. अधिकारी व कर्मचारी यांचा स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग एकजुट आहेत. याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

या पार्श्वभूमीवर सदर प्रकाराबाबत आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी आज कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर केले . यावेळी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे,सखाराम सपकाळ, शाम लाखे, दिनेश तेली, रमेश कांबळे, आदि विविध सरकारी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या

प्रशासनाच्या कामकाजावर टीका करायची असल्यास ती पुराव्यांसह व लोकशाहीच्या सभ्य मर्यादेत करण्यात यावी.

उपोषण व सत्याग्रहासारख्या लोकशाहीतील पवित्र मार्गांचा वापर प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वैयक्तिक बदनामी अथवा प्रसिद्धीसाठी करू नये.

सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती, दिशाभूल करणारा मजकूर आणि प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांची प्रतिमा मलिन करणारे साहित्य प्रसारित होऊ नये .

प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे वातावरण बिघडविणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने प्रोत्साहन देऊ नये.

एखाद्या अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास त्‍याविरुध्‍द सनदशिर मार्गाचा अवलंब करण्यात यावा.

प्रांत कार्यालय कुडाळ समोरील आंदोलनाच्या ठिकाणी वैयक्तिक जिल्हाधिकारी यांचा फोटो लावला आहे त्याचा शोध पोलिस यंत्रणेने घ्यावा .

संघटनेची भूमिका —

प्रशासनावर विधायक टीका करण्यास आमचा विरोध नाही; मात्र प्रशासकीय व्यक्तीची वैयक्तिक स्‍वरुपा

प्रतिक्रिया व्यक्त करा