You are currently viewing वेंगुर्ल्यात ‘लक्ष्मी आधार’ प्रदर्शनानिमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ल्यात ‘लक्ष्मी आधार’ प्रदर्शनानिमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ल्यात ‘लक्ष्मी आधार’ प्रदर्शनानिमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन

महिला उद्योजिका, हस्तकला व गृहउपयोगी वस्तूंना प्रसिद्धी देण्याची संधी; प्रथम क्रमांकासाठी ५ हजारांचे पारितोषिक

वेंगुर्ला :

इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्ष्मी आधार भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२६’ निमित्त रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रसिद्धी मिळावी, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि प्रदर्शनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत भरणाऱ्या या प्रदर्शनात महिलांच्या हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, विविध उत्पादने आणि महिला उद्योजिकांच्या उपक्रमांची माहिती घेता येणार आहे. या प्रदर्शनातील उत्पादने, स्टॉल, महिला उद्योजिका किंवा खरेदीचा अनुभव यावर आधारित रील्स स्पर्धकांनी तयार करायच्या आहेत.

स्पर्धेतील पारितोषिके अशी : प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेसाठी व्हिडिओचा कालावधी किमान ३० सेकंद ते जास्तीत जास्त एक मिनिट असावा. व्हिडिओ मराठी भाषेत, स्वतः तयार केलेला आणि सत्य व सकारात्मक आशयाचा असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपली रील Instagram वर पोस्ट करताना

#laxmi_aadhar_26

हा हॅशटॅग वापरून संबंधित Instagram खात्याला टॅग करावे. पोस्टची लिंक Google Form द्वारे पाठवावी. मिळालेल्या लाइक्सच्या संख्येनुसार विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

व्हिडिओ अपलोड करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, विजेत्यांची घोषणा १ नोव्हेंबर २०२६ रोजी महोत्सवाच्या समारोप समारंभात करण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

कला, उद्योजकता आणि महिलाशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

https://forms.gle/bfjt96UgXN2spdSd7

 

प्रतिक्रिया व्यक्त करा