You are currently viewing सामान्य जनतेला मास्कची सक्ती आणि दंडात्मक कारवाई मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मास्क’ची सूट.

सामान्य जनतेला मास्कची सक्ती आणि दंडात्मक कारवाई मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मास्क’ची सूट.

सर्वसामान्य जनतेला एक न्याय व सत्ताधाऱ्यांना दुसरा असे कुडाळ तहसीलदार कार्यालयाचे दुटप्पी धोरण.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या कालच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचे निवेदन स्वीकारताना तहसीलदार कुडाळ यांना कोरोनाचा विसर पडला का- मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल

तालुक्यातील तळागाळातील गावातून तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे येण्यासाठी सध्या मिळेल ते वाहन करून येणाऱ्या सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये प्रवेशही नाकारला जातो असे चित्र आहे.भर उन्हात आणि पावसाळा सहन करून बाहेरच्या खिडकीवर ताटकळत उभे राहावे लागते अशा परिस्थितीत कधीकधी दिवसभर राहून सुद्धा जनतेची काम होत नाहीत. मात्र सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाला कालच्या महाविकास आघाडीच्या आंदोलकांची गर्दी कशी काय चालते हा खरा सवाल आहे.
एकीकडे सत्ताधारी आरोग्यमंत्री म्हणत आहे की दुसरी लाट झाली आता तिसरी लाट येईल भविष्यात चौथी लाट येईल तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाचे आंदोलक करोना चे नियम धाब्यावर बसवून माननीय दंडाधिकारी कुडाळ यांना गर्दी करून निवेदन देण्यासाठी आले असता हे कसे चालते..? जर हे नियमांचे उल्लंघन चालणार असेल आणि यामुळे कोरोनाचा कोणताही त्रास होणार नसेल तर मग आपल्या कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या नियमात सुट द्यावी अशी खोचक टीका मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 2 =