You are currently viewing आ.  वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात

आ. वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात

*नागरिकांच्या समस्या घेणार जाणून*

कुडाळ :

नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते १:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते कुडाळ तालुक्यातील सातबारा, फेरफार नोंदी तसेच इतर गोष्टींचा आढावा घेणार आहेत. तरी यासंदर्भात काही अडचणी/समस्या असतील त्या नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − six =