You are currently viewing गव्या रेड्याच्या हल्ल्यात ओटवणे येथील युवक गंभीर

गव्या रेड्याच्या हल्ल्यात ओटवणे येथील युवक गंभीर

चराठे ओटवणे मार्गावरील घटना

 

सावंतवाडी :

 

गवा रेड्याने धडक देत शिंगाने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाला.शंकर नाना गावकर हा तीस वर्षीय युवक सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावातील रहिवासी आहे. उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले. बरगडीला मोठी जखम झाल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. चराठे ग्रामपंचायत सदस्य अमित परब तसेच विनोद सावंत, महेश चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत या युवकाची विचारपूस केली. शंकर गांवकर हा युवक इन्सुली येथील माऊली दशावतार नाट्य मंडळात झांजवादक म्हणून काम करतो. गुरुवारी आपल्या काही खाजगी कामानिमित्त तो सावंतवाडी शहरात आला होता. तेथून सायंकाळी उशिरा ओटवणे येथे आपल्या घरी परतत असताना चराठा येथे रस्त्यात अचानकपणे गवा रेडा आडवा आला. गवा रेड्याच्या धडकेत तो रस्त्यावर कोसळला त्यातच गवा रेड्याने माघारी फिरत त्याच्यावर शिंगाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला ताबडतोब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा